सोनम कपूर आणि रिया कपूरचा कपड्यांचा ब्रँड न्यूयॉर्कमध्ये

0

सोनम कपूर संजय दत्तच्या बायोपिकसाठी न्यूयॉर्कमध्ये शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तिची बहिण रिया कपूर आगामी चित्रपट वीरे दि वेडिंगसाठी कॉस्ट्यूम डिझाईन करीत आहे. दोन्ही बहिणी आपला फॅशन ब्रँड रेहसनचा प्रसार करण्यातही गुंतल्या आहेत. कपड्यांची नवी मालिका रिलेक्सिस्तान त्या आणीत आहेत. त्यांनी अनिवासी भारतीय असलेल्या पाच मॉडेलची यादीही तयार केली आहे. ज्या महिला आरामात काम करतात त्यांची एक खास शैली असते, अशी शूटिंगची थिम आहे. फॅशन लाईन शुटिंगसाठी न्यूयॉर्क नंदनवन आहे, असे मानतात.