सोनलपाडा धरणात तीन जण बुडाले

0

कर्जत : कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणात शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास तीन जण बुडाले असल्याची घटना घडली. यापैकी दोन जणांचे मृतदेह सापडले असून त्यात पोशीर येथील प्रवीण तुकाराम राणे (24), कशेळे येथील दिलीप महादू खंडागळे (35) यांचे मृतदेह सापडले आहेत. तर कल्याण शिवशक्तीनगर नेतिवली येथील सचिन रामचंद्र कानडे याचा शोध सुरु आहे. शुक्रवारी या धरणावर गर्दी झाली होती. त्यावेळी तीन जणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने धरणाच्या खोल भागात बुडाले आल्याची घटना आज घडली. स्थनिक ग्रामस्थांनी त्यातील दोन पर्यटकांचे मृतदेह बाहेर काढले तर एका पर्यटकाचा शोध सुरू आहे.

मागील वर्षी घातली होती बंदी
सोलनपाडा धरणावर पर्यटकानाचा गेली तीन वर्षांपासून लोंढा वाढत आहे. यामध्ये दरवर्षी पर्यटकांचा बळी जात आहे. पर्यटकांची हुल्लडबाजी आणि वाढत जाणारी गर्दी यामुळे सोनलपाडा धरणावर पर्यटकांचे बुडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. गेल्यावर्षीही या सोनलपाडा धरणावर दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता त्यावेळी स्थानिक प्रशासनाने जमाव बंदीचा आदेश काढून या सोनलपाडा धरणासह तालुक्यातील धरण व धबधब्यांवर पर्यटकांवर बंदी घालण्यात आली होती.