कल्याण : डोंबिवली पूर्वेत एका सोनसाखळी चोरट्याने पायी चालणार्या तरुणाच्या पाठीवर वार करत त्याच्या गळ्यातील 22 हजारांची सोन्याची चेन खेचून पळ काढला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील दावडी गाव येथील हनुमान मंदिर परिसरात राहणारा विशाल खाणे हा विद्यार्थी बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील टंडन रोड नेत्रालय प्लॅश जिम येथून पायी जात असताना तरुणाने त्याला हटकले. त्याच्या पाठीवर चाकूने वार करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची खेचून पळ काढला. या हल्ल्यात विशाल जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.