जळगाव । वर्षा कॉलनीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना 9 एप्रिल रोजी सकाळी 7.30 ते 8 वाजेच्या दरम्यान घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी रविवारी चोरट्याला अटक केली. त्याला सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 27 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.
85 हजारांची लांबविली सोनसाखळी
वर्षा कॉलनी परिसरातील रहिवासी नलिनी प्रल्हाद भोळे (वय-72) ह्या परिसरातीलच दत्त मंदिराच्या जवळ 9 एप्रिल रोजी सकाळी 7.30 ते 8 वाजेच्या दरम्यानात फिरत असतांना मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांची 85 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून चोरून नेली होती. याप्रकरणी वृध्द महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी श्रीरामपूर येथील ईराणी टोळीतील कासीम शहा गरीब शहा (वय 28) याला रविवारी अटक केली. तर त्याचा दुसरा साथीदार सरफराज खान ईराणी(रा. अंबीवली, मुंबई) हा फरार आहे. कासीम याला सोमवारी न्यायाधीश एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 27 मेपर्यंत कोठडी सुनावली आहे.