सोनसाखळी चोरट्यास 3 जुनपर्यंत सुनावली पोलिस कोठडी

0

जळगाव। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी महिलेची पोत लांबविली होती. त्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याला आज बुधवारी न्यायाधीश के.एच. ठोंबरे यांच्या न्यायालयात हजर केले असता 3 जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सेवानिवृत्त शिक्षका विजया नारायण कदम ह्या 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या चंद्रमा अपार्टमेंन्टच्या बाहेर उभ्या असतांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पल्सरवरून आलेल्या दोघांनी त्यांची 54 हजार रुपये किंमतीचे पोत हिसकावून चोरून नेली होती. याप्रकरणी विजया कदम यांच्या फिर्यादीवरून रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी रामानंद पोलिसांनी कासिम शहा गरीब शहा इराणी (वय-29 रा. श्रीरामपुर) यास अटक केली. त्याला आज बुधवारी न्यायाधीश के.एच. ठोंबरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 3 जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.