सोनसाखळी लांबवली

0

राजगुरूनगर । एसटी बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन एका इसमाच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची चैन लांबवली. यशवंत भगवंत चितळकर (वय 23) हे राजगुरूनगर येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कुलचे मुख्याध्यापक आहेत. कार्यलयीन कामकाज उरकून शनिवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ते राजगुरूनगर येथून पुण्याला जाण्यास निघाले होते. बसमध्ये चढताना चोरट्यांनी चितळकर यांच्या गळ्यातील सुमारे 87 हजार 500 रूपये किंमतीची सोनसाखळी चोरली. याबाबत खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.