निगडी : परिसरामध्ये आपल्या मैत्रीणीसोबत पायी चाललेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. ही घटना प्राधिकरण येथे शुक्रवारी घडली. जया मुरलीधर रमानी (वय 66, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जया या शुक्रवारी सायंकाळी प्राधिकरणातील लक्ष्मी कॉलनीतील विवेक मित्र मंडळाजवळून मैत्रिणींसोबत रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. उपनिरीक्षक व्ही. एस. वल्टे अधिक तपास करीत आहेत.