मुंबई : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते आणि सोशल मीडियावर सक्रिय असते. अशातच सोनाक्षीने तिच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर तिच्या घरातील नव्या पाहुण्याचा एक फोटो शेअर केला असून त्यासोबतच एक व्हिडिओही शेअर केला आहे. सोनाक्षीच्या नव्या पाहुण्याचं नाव ब्रॉन्झ असं असून ते एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू आहे. सोनाक्षीने ब्रॉन्झचा फोटो शेअर करुन त्याचं स्वागत केलं आहे.