सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये लाँग इनिंग खेळायचीय

0

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाला पाहता-पाहता या हिंदी सिनेमात सात वर्षं पूर्ण झाली. या काळात चाहत्यांकडून एवढे प्रेम मिळाले की मी पुढची सत्तर वर्षं इथे आरामात टिकू शकते, असे वक्तव्य सोनाक्षीने केले आहे. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या या कन्येने करिअरच्या पदार्पणातच बॉलिवूडमध्ये जम बसवला. सलमान खानसारखा मेंटॉर मिळाल्याने तिने पदार्पणातच हिट सिनेमे दिले. त्यानंतर अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत दिलेल्या हिट सिनेमांमुळे तिला कोटी क्लबचे सिनेमे करणारी अभिनेत्री असा किताबही तिच्या चाहत्यांकडून बहाल करण्यात आला होता. त्यानंतर मात्र गेली काही दोन वर्षं हवा तसा सिनेमा तिला मिळालेला नाही. त्यामुळे आगामी सिनेमांवरच तिची भिस्त आहे.सोनाक्षीने या प्रवासात तिच्या मेंटॉरना न विसरता धन्यवाद दिले आहेत. तिच्या ट्विटरच्या माध्यमातून तिने सलमान खान, अरबाझ खान आणि अभिनव कश्यप यांचे आभार मानले आहे.