‘कलंक’ हा अद्भूत चित्रपट असेल – सोनाक्षी

0

मुंबई : आगामी चित्रपट कलंक साठी शूटिंग करणाऱ्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने म्हंटले की, अभिषेक बर्मन दिग्दर्शित हा चित्रपट एक उत्कृष्ट चित्रपट असेल. मंगळवारी यस बॅंकच्या फुटबॉल लीग्स कप स्पर्धेच्या प्रसंगी सोनाक्षीने पत्रकारांशी बोलताना सांगितले. चित्रपटाच्या संदर्भात, सोनाक्षी म्हणाली की, चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव चांगला होता. मला वाटते की हा अद्भुत चित्रपट असेल. मी यात वेगळी भूमिका बजावत आहे.

पुढे सोनाक्षी म्हणाली की , “मला वाटतं की प्रेक्षकांनी मागील चित्रपटांमध्ये मला अशा भूमिका करताना पहिले नव्हते, म्हणून ती खूप मनोरंजक असेल.” 1977 मधील इन्कार या चित्रपटातील प्रसिद्ध गाण मुगडा या पुनर्निर्माण केलेल्या गाण्यावर सोनाक्षी थिरकताना दिसेल. हे गाणे हेलेन आणि अमजद खानवर चित्रित केले गेले आहे.

सोनाक्षी म्हणाली, “मी याबद्दल खूप उत्साहित आहे, यावर्षी हेलेन आंटीचे दुसरे गाण असेल, कारण मी यापूर्वी ‘हैप्पी फिर भाग जाएगी’ साठी चिन-चिन चू हे गाण केले आहे. सोनाक्षीने मी टू मूवमेंट वर बोलताना म्हणाली की, तुम्ही हे विचारात असाल तर, जर स्त्रियांना छेडछाड केली गेली तर त्यांनी आवाज उठवावा? नक्कीच, त्यांनी आवाज उठवावा आणि त्यासाठी जे काही जबाबदार आहेत त्यांनी त्यांना शिक्षा करावी.