सोनाक्षी सिन्हा कॉमेडी रोल करणार!

0

सोनाक्षी सध्या तिची इमेज बदलण्याचा प्रयत्न करतेय. आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी ती सध्या न्यूयॉर्कमध्ये हा सिनेमा पहिला भारतीय स्टेज रिअ‍ॅलिटी प्रकारातला सोनाक्षीसह पंजाबी अभिनेता दलजित दोसांज प्रमुख भूमिकेत भूमिकेसाठी दोघेही घेत आहेत खूप मेहनत ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा सध्या तिची इमेज बदलण्याच्या प्रयत्नात आहे. आगामी सिनेमात सोनाक्षी धमाल विनोदी भूमिकेत दिसणार आहे.

निर्माते वाशू भगनानी यांच्या आगामी सिनेमासाठी ती सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. सोनाक्षीला इमेज बदलणारा सिनेमा हवा होता आणि त्यासाठी तिनं विनोदी भूमिका स्वीकारली आहे. हा सिनेमा पहिला भारतीय स्टेज रिअ‍ॅलिटी प्रकारातला सिनेमा असणार आहे. या सिनेमात सोनाक्षीसह प्रसिद्ध पंजाबी अभिनेता दलजित दोसांज हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमातल्या भूमिकेचे तपशील सोनाक्षीनं अद्याप जाहीर केलेले नाहीत. ती म्हणाली, ‘या सिनेमात ही एक भन्नाट विनोदी भूमिका साकारते आहे ही गोष्ट खरी आहे. दलजित आणि मी त्यासाठी खूपच मेहनत घेत आहोत. अशा प्रकारचा हा माझा पहिलाच सिनेमा असल्याने माझ्या मनात उत्सुकता आणि भीती या दोन्ही गोष्टी आहेत.’ तिची या सिनेमातली भूमिका काय आहे हे तिनं सांगितलेलं नसलं तरी ती न्यूयॉर्कमध्ये धमाल करते आहे. बोट राइडपासून आवडीच्या ठिकाणी फिरण्यापर्यंत सगळ्या गोष्टी ती करतेय आणि चाहत्यांना फोटोंच्या माध्यमातून त्याची माहितीही देते.