सोनालीच्या तब्येतीत सुधारणा; लवकरच मायदेशी येणार

0

मुंबई : न्यूयॉर्कमध्ये हाय ग्रेड कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सोनालीच्या तब्येतीत सुधारणा होत असून येत्या डिसेंबर महिन्यात ती मायदेशी परत येऊ शकते असं तिची मैत्रीण आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिनं सांगितलं आहे.

अभिनेत्री नम्रता शिरोडकर पती अभिनेता महेश बाबू आणि मुलांसोबत सुट्टीसाठी न्यूयॉर्कला गेली होती. न्यूयॉर्कमध्ये तिनं सोनालीची भेट घेतली. ‘सोनाली खूपच शूर आहे आता ती पहिल्यासारखीच फिट दिसत असून लवकरच तिचं आयुष्य पूर्वीसारखं सुरू होईल’,असं नम्रतानं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. सोनाली आणि नम्रता यांनी जवळपास दोन तास मनमोकळ्या गप्पा मारल्या. कॅन्सरशी लढताना सकारात्मकपणे कसं तोंड दिलं, असे आजारपणाविषयीचे चांगले-वाईट अनुभव सोनालीनं नम्राताशी शेअर केले.