सोनाली कुलकर्णी लवकरच झळकणार ऐतिहासिक चित्रपटात!

0

मुंबई-मराठी सिनेजगतातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख असलेली सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयाने भल्याभल्यांना भुरळ घातले आहे. ती आता चाहत्यांना एका ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटात दिसणार आहे. सोनालीच्या या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण जवळ-जवळ पूर्ण झाले आहे. हा चित्रपट बायोपिकसारखा असणार आहे. परंतु, या चित्रपटाचा नेमका विषय काय, चित्रपटाचे नाव काय असेल ही माहिती मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
या आधी सोनाली कुलकर्णी अजिंठा या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

सोनाली नेहमीच चित्रपट स्वीकारण्याबाबत चोखंदळ असते. ती म्हणते, ‘अलीकडे केवळ झगमगाट आणि फॅशन म्हणजे सिनेमा हे समीकरण राहिलेले नाही. आता चित्रपटाच्या कथेला सर्वाधिक महत्त्व असते. मराठी इंडस्ट्रीत प्रचंड ताकदीचे आशय असलेल्या चित्रपटांची निर्मिती होते आहे असे सोनाली नेहमी म्हणत असते.