सोनाली बेंद्रेंचे पती राम कदमांवर भडकले !

0

मुंबई-बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अमेरिकेत उपचार घेत आहे. बॉलिवूडसह अनेक चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. मात्र, असे असताना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजप नेते राम कदम यांनी सोनालीच्या निधनाचे बेजबाबदार ट्विट करुन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. त्याच्या या बेजबाबदार ट्विटमुळे सोनाली बेंद्रेचे पती गोल्डी बहेल चांगलेच संतापले आहेत.

भाजपचे नेते राम कदम यांनी सोशल मीडियावर सोनाली बेंद्रेच्या निधनाचे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी सोनालीला श्रद्धांजली वाहिली होती़ नंतर ही अफवा असल्याचे कुणीतरी त्यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांना उपरती झाली. यानंतर ही अफवा असल्याचे सांगत, त्यांनी ते ट्विट डिलिट करत सारवासारव करण्याचे प्रयत्न केलेत. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी त्याचा स्क्रिनशॉट काढून राम कदम यांना जाब विचारण्यात सुरुवात केली होते. त्यांचे ते ट्विट थोड्याच वेळात व्हायरल झाले होते. हा सगळा प्रकार सोनालीच्या चाहत्यांनांच नाही तर सोनालीच्या जवळच्यांनाही दुखावून गेला़ सोनालीचे पती गोल्डी बहेल यामुळे कमालीचे संतापले आहेत.

सोशल मीडिया वापरकर्त्यांना जबाबदारी करा़ अफवेवर विश्वास ठेवून आणि त्या पसरवून संबंधितांना नाहक त्रास देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.