सोनाली बेंद्रेबाप्पाला मिस करतेय , शेअर केली भावनिक पोस्ट

0

मुंबई : बॉलीवूडची अतिशय देखणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरशी लढत असून सध्या ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. सोशल मीडियावर सोनाली तिच्या चाहत्यांना आपल्या प्रकृतीबद्दलची माहितीही देत असते.अशातच सोनालीने एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी बाप्पाचे स्वागत केले. मात्र सोनाली बेंद्रे न्यूयॉर्कमध्ये असल्यामुळे तिला या उत्सवाची मजा घेता नाही आली. याबद्दल तिने आपल्या घरातील गणपतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच तिने हा उत्सव मिस करत असल्याचीही लिहले.

शेअर केलेल्या फोटोत सोनालीचा मुलगा रणवीर बाप्पाची पूजा करत असल्याचे दिसत आहे.