सोनाली बेंद्रे कॅन्सरने त्रस्त ; न्यूयॉर्कमध्ये घेत आहे उपचार

0

नवी दिल्ली । बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्याबद्दल एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. की सध्या ती कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असून, न्यॉर्कमध्ये ती उपचार घेत आहे. या संदर्भातील ही माहिती स्वतः सोनाली बेंद्रेनेच ट्विटद्वारे दिली आहे. तीने यामध्ये म्हटले आहे की, तिला हाय ग्रेड कॅन्सर झाला आहे. या आजाराबद्दल तिला कसलीही कल्पना माहिती नव्हती. त्यामुळे डॉक्टरांच्या मदतीने ती या आजाराविरुद्ध संघर्ष करत आहे. तिचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार यांची कृपा तिच्यावर असल्याचेही तिने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.