सोनाली बेंद्रे यांना श्रद्धांजली वाहिल्याने आमदार कदम पुन्हा ट्रोल; ‘या’ शब्दात व्यक्त होतोय संताप

0

मुंबई-विदेशात कर्करोगावर उपचार घेत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रे जिवंत असतांना त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिल्याने भाजपचे आमदार राम कदम पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे.

आमदार कदम यांनी ट्विट करून अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र त्या जिवंत असतांनाच त्यांना श्रद्धांजली वाहण्याची घोडचूक आमदार कदम यांनी केल्याने ते नेटिझन्सकडून चांगलेच ट्रोल होत आहे.

सोनाली बेंद्रे यांना श्रद्धांजली वाहिल्याने कदमांवर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले चांगलेच संतापले आहे.