सोनिया गांधी गणितात कच्च्या-अनंतकुमार

0

नवी दिल्ली-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. सोनिया गांधींनी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचे संकेत दिले होते दरम्यान गुरूवारी संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी त्याला प्रत्युत्तर देत सोनिया गांधींचे गणित कच्चे असल्याची टीका केली आहे. सोनिया गांधींना आकडेवारी समजत नाही.

मोदी सरकार बहुमतात आहे. सरकारला संसदेतही समर्थन आहे आणि संसदेच्या बाहेरही मोठा पाठिंबा असल्याचे अनंतकुमार यांनी ठामपणे सांगितले. संसदेबाहेर माध्यमांबरोबर ते बोलत होते. सोनिया गांधी यांचं गणित कच्चं आहे. त्यांना आकडेवारी समजत नाही. १९९६ मध्येही त्यांनी असाच आकड्यांचा खेळ केला होता.. नंतर काय झालं, हे जगासमोर आहे. यावेळीही त्यांचे गणित कच्चे असल्याने त्यांना योग्य आकड्यांचा मेळ बसवता येत नसल्याचे म्हटले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अशा अविश्वास प्रस्तावाचा काहीच उपयोग नसल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी आम्ही पुन्हा बहुमत सिद्ध करू. अविश्वास प्रस्ताव सहज जिंकू असा विश्वास व्यक्त करत विरोधी पक्षांना आमची तेव्हाच ताकद दिसून येईल असे म्हटले होते.