सोनिया-राहुल गांधींना कोर्टाकडून दणका: नॅशनल हेराल्ड प्रकरणी दस्तावेजाची फेरतपासणी

0

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने नॅशनल हेराल्ड प्रकरणी आयकर विभागाला माजी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, विद्यमान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ऑस्कर फर्नाडीस यांच्या २०११-१२ मधील टॅक्स दस्तावेजची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश आज दिले.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या याचिकेवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही. भाजप नेता सुब्रमण्यम स्वामी यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांजवळ सोनिया आणि राहुल गांधी यांच्याबाबत तक्रार नोंदविली आहे.