मुंबई : धार्मिक स्थळांवर लावल्या जाणार्या लाऊडस्पीकरच्या विरोधात गायक सोनू निगमने ट्विट करत आपल्याला होणार्या त्रासाबद्दल आवाज उठवला. त्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर सोनू निगम याप्रकरणी मागे हटेल, असे वाटले होते. परंतु, रविवारी पहाटे सोनूने ङ्गगुड मॉर्निंग इंडियाफ ट्विट करत आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दाखवले आहे. यावेळी सोनूने आपल्या घरात येणार्या अजानच्या आवाजाचा व्हिडिओही अपलोड केला आहे.
अजानसंदर्भातील वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आलेल्या सोनू निगमने रविवारी पुन्हा एक नवीन ट्विट केले. सोनूच्या या नव्या ट्विटमुळे या वादाला नवीन वळणं येणार असल्याचे दिसून येत आहे. सोनूने या नव्या ट्विटमध्ये अजानचा व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यासोबत गुड मॉर्निंगचा संदेश दिला आहे. सोनूने ट्विट केलेला हा व्हिडिओ दोन मिनिटे 20 सेकंदांचा आहे. काही दिवसांपूर्वी सोनू निगमने अजानसंदर्भात केलेल्या ट्विटमुळे वाद निर्माण झाला होता. सोनूने या ट्विटमध्ये मी मुस्लीम नाही, तरी अजानमुळे माझी झोपमोड का? असा प्रश्न उपस्थित करत, मुस्लीम धर्माच्या अजानवर आक्षेप घेतला होता. सोनू निगमच्या ट्विटवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी नमाजसाठी अजान महत्त्वाची आहे. पण आजच्या आधुनिक युगात लाऊडस्पीकर गरजेचं नाही. अशी प्रतिक्रिया ट्विटरवर दिली होती.तर, काही मुस्लीम धर्मगुरुंनी सोनूच्या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला होता. एका मौलानाने टक्कल करून फिरवण्याची धमकी दिली होती. यानंतर सोनूनं पत्रकार परिषद घेऊन माफीनामा सादर केला होता.
म्हणून गुड मॉर्निंगचा संदेश
सोनूच्या या नव्या ट्विटमुळे या वादाला नवीन वळणं येणार असल्याचे दिसून येत आहे. सोनूने या नव्या ट्विटमध्ये अजानचा व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यासोबत गुड मॉर्निंगचा संदेश दिला आहे. सोनूने ट्विट केलेला हा व्हिडिओ दोन मिनिटे 20 सेकंदांचा आहे. सोनूला या ट्विटमधून, लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे दररोज सकाळी झोपेतून उठावे लागते, असे सांगायचे असावे. म्हणून गुड मॉर्निंगचा संदेश सोनूने ट्विटमध्ये दिला आहे.
सी ग्रेड प्रोड्युसरची धमकी येईल
सोनूच्या ट्विटनंतर सेलिब्रिटींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. कंगनानेही याप्रकरणी आपले मत नोंदवले. दरम्यान, अजानसंबंधित प्रियांकाचा एक जुना व्हिडिओही व्हायरल झाला होता. सोनूच्या रविवारच्या ट्विटनंतर अभिनेता कमाल राशिद खान (केआरके) म्हणाला, आता काही सी ग्रेड प्रोड्युसर सोनूला बायकॉटची धमकी देतील. जर मी एखादी फिल्म बनवली तर सर्व गाणे सोनू निगमलाच गायला देईल.