सोने, चांदीच्या दरात घट

0

पिंपरी : जागतिक बाजारातूनही नकारात्मक संदेश आले त्याचबरोबर सोन्याची स्थानिक बाजारातूनही खरेदी झाली नाही. त्यामुळे शनिवारी भारतीय बाजारातही सोन्याच्या दरात घट नोंदली गेली. गेल्या तीन दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ होत होती. दिल्ली सराफात शनिवारी स्टँडर्ड सोन्याच्या दरात 250 रुपयांनी घट होऊन दर 31050 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेले. त्याचबरोबर शुद्ध सोन्याच्या दरात 250 रुपयांनी घट होऊन या सोन्याचे दर 31200 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेले. काल सोन्याचे दर 175 रुपयांनी वाढले होते. शनिवारी तयार चांदीचे दरही 350 रुपयानी कमी होऊन 40650 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 1.17 टक्क्यांनी तर चांदीचे दर 1.44 टक्क्यांनी कमी झाले.