सोने-चांदीने पुन्हा भाव खाल्ला

0

मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून सोने-चांदीच्या दरात घसरण झाली होती. मात्र आज शुक्रवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदी खरेदीत वाढ झाल्याने किंमतीतही वाढ झाली. सध्या कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रती ग्रॅमला ३७८ रुपयांनी वाढला असून तो १० ग्रॅमला ५१२८० रुपये झाला आहे. चांदीच्या दरात आज एक किलोला ९५४ रुपये वाढ झाली आहे. चांदीचा भाव ६६११४४ रुपये आहे.

गेल्या आठवडाभरात सोन्याच्या किमतीत सरासरी ५००० रुपयांची घसरण झाली होती. तर गुरुवारच्या सत्रात सोने दरात ९०० रुपयांची तर चांदीमध्ये २५०० रुपयांची घसरण झाली होती. कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये नफावसुली झाल्याने या दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण सुरु होती. मात्र आज या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज सोने वधारले असून पुन्हा एकदा बाजारात तेजी परतली आहे.

आज शुक्रवारी दिल्लीत २२ कॅरेट सोने ५०६१० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२२१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोने ५०१२० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२८२० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा भाव ४९२७६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५४२८० रुपये आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०३६० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५१३६० रुपये आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १९२९.२९ डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.१ टक्के वाढ झाली आहे. आधीच्या सत्रात सोने दरात १ टक्के घसरण झाली होती.चांदीचा भाव ०.१ टक्के घसरला असून तो प्रती औंस २७.०१ डॉलर आहे. बुधवारी कमाॅडिटी बाजारात सोने ९०० रुपयांनी वधारले होते.