32 हजार रूपये तोळा
सीरियावरील हल्ल्याचा परिणाम
मुंबई : बुधवारी अक्षय्य तृतीया असून बहुतेक जण अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सोने खरेदी करतात. पण सोन्याच्या भावाने 32 हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडल्याने अनेकांचा हिरमोड होणार आहे. सीरियावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव आहे. त्याचा परिणाम सोन्या-चांदीवर झाला आहे. सोन्याचा भाव तोळ्याला 32, 300 रुपयांवर गेला आहे. गेल्या काही वर्षातील अक्षय्य तृतीयेचा सोन्याचा हा सर्वाधिक भाव आहे. तर चांदीचा भावही 40 हजार रुपये किलोवर गेला आहे.
जगभरात भाव वाढला
गेल्या वर्षी 9 मे रोजी अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भावा 29, 860 रुपये होता. 2018 च्या सुरुवातीला सोन्याचा भाव प्रति तोळा (10 ग्रॅम) 28, 500 रुपये होता. येत्या काही दिवसात सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोने महाग झाल्याने खरेदीत घट होईल, हा अंदाज सरफांनी खोडून काढला आहे. सोन्याचा भाव वाढला तरी ग्राहक दागिने, नाणे आणि बिस्कीटांमध्ये गुंतवणूक करतील. या मागचे कारण हिर्यांपेक्षा ग्राहकांचा ओढा सोन्याकडे अधिक असल्याचे सांगितले जाते. सोन्याचा भाव जगभरात भाव वाढला आहे.