धुळे । धुळे जिल्ह्यात भृणहत्या व लिंगनिदान करण्याच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून चांगली पाउले उचलली जात आहेत. या केंद्रांवर आता प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. धुळे जिल्ह्यातील 35 सोनोग्राफी केंद्रांपैकी 11 सोनोग्राफी केंद्रांना एक वेळा तपासणी करण्यात आली असून, प्रत्येकी तीन महिन्यात एक वेळा असे वर्षभरात 4 वेळा एकूण 140 सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. एम. पी. सांगळे यांनी दक्षता समितीच्या बैठकीत दिली. जिल्हास्तरीय दक्षता पथकाने धुळे जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरला नियमितपणे भेट देत पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हास्तरीय दक्षता पथक समितीची बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
140 सोनोग्राफी केंद्रांची तपासणी
या बैठकीत डॉ. सांगळे यांनी सांगितले, जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत एकूण 63 सोनोग्राफी केंद्र असून त्यात 2 शासकीय, 2 गव्हर्नमेंट व्हेटर्रनरी व 59 खाजगी केंद्र आहेत. जिल्हातील 35 सोनोग्राफी केंद्रांपैकी 11 सोनोग्राफी केंद्रांना एक वेळा तपासणी करण्यात आली असून, प्रत्येकी तीन महिन्यात एक वेळा असे वर्षभरात 4 वेळा एकूण 140 सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात येणार आहे. सोनोग्राफी केंद्रांबाबत सध्या एकही तक्रार आली नसल्याचे डॉ. सांगळे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती व जिल्हा समन्वय समितीची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात झाली. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे अध्यक्षस्थानी होते. बैठकीस डॉ.सांगळे, डॉ. शिंदे, शीतल पाटील, समन्वयक एड्स प्रतिबंध नियंत्रण समिती, डॉ. आर. व्ही. पाटील माता बाल संगोपन, डॉ. डांगे, अधीक्षक, भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय, धुळे, तसेच समितीचे इतर शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.
अधिकार्यांची होती उपस्थिती
यावेळी पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. एम. पी. सांगळे, गणेश मिसाळ, प्रातांधिकारी, धुळे, अमोल मोरे तहसीलदार, धुळे, डॉ.संजय शिंदे, ड. गणेश पाटील, सरकारी वकील, डॉ. आर. व्ही. पाटील, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जयश्री शहा, ड. चंद्रकांत चौधरी, डॉ. हर्षवर्धन चित्तम, नोडल ऑफीसर, ड. रसिका निकुंभ, कायदा सल्लागार, डॉ. एम. आर. शेख, गजानन चौधरी, एस. डी. परदेशी, एन. एन.साळे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषधे, डॉ. महेश मोरे आरोग्य अधिकारी, पीसीपीएनडीटी समिती सदस्य उपस्थित होते.