उल्हासनगर: शहरातील कॅम्प नं. ३ येथिल इंदिरानगर परिसरातील बालाजी कंपाउंडलगत विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ गिता पानटपरी हे दुकान आहे. कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्या पानटपरीतून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ४९ हजार रूपयाचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. अधिक तपास मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे पो.उप.नि.खाडे करीत आहेत.
खिडकीवाटे घरात घुसून चोरी
उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ४ येथिल समता कॉलेनी परिसरात अविनाश पंडित(२९) हा तरूण राहतो. कोणीतरी अज्ञात चोरटयाने पहाटेच्या सुमारास घराच्या उघडया खिडकीवाटे आत प्रवेश केले. घरातील मोबाईलटॅब, मोबाईलफोन, रोख रक्कम, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पेनकार्ड, मतदान कार्ड असा एकूण ४७ हजार ५०० रूपयाचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी अधिक तपास विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे पो.ना.बुधवंत करीत आहेत.
चार्जरसह रोख रक्कम लंपास
उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ५ येथिल कालीमाता मंदिरजवळ आनंद तुलसाणी(५२) यांचे सिध्दीविनायक मोबाईल रिचार्जचे दुकान आहे. कोणीतरी अज्ञात चोरटयाने दुकानाच्या छताचा पत्रा तोडून त्यावाटे आत प्रवेश केले. दुकानातील चार्जर, इयरफोन व रोख रक्कम असा ९ हजार ९६० रूपये किंमतीचा माल घरफोडी करून चोरून नेला. अधिक तपास हिललाईन पोलिस ठाण्याचे स.पो.पो.बुआ करीत आहेत.
हाताला फटका मारून मोबाईल खेचून नेला
उल्हासनगर अंबरनाथ पुर्व येथिल कानसई परिसरात कु.स्वप्निल झांबरे(२५) हा तरूण राहतो. तो सायंकाळच्या सुमारास अंबरनाथ पुर्व येथिल गुरूकुल बंगल्यासमोरू न पायी जात होता. मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या २ चोटयांपैकी एकाने स्वप्निल याच्या हाताला जोरात फटका मारून त्याच्या हातातील ४ हजार रूपये किंमतीचा मोबाईलफोन जबरीने हिसकावून चोरून नेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २ अज्ञात चोरटयांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.उप.नि.डांगे करीत आहेत.