सोन्याच्या दराची लवकरच फिफ्टी !

0

मुंबई: देशभरात आर्थिक मंदीची लाट असताना सोन्याच्या दारात मात्र वाढ होत आहे. सोन्याने ३९ हजारांचा टप्पा ओलांडला असून लवकरच ५० हजार रुपयापर्यंत सोन्याचे दर पोहोचतील असा अंदाज सराफ बाजारातून वर्तविला जातो आहे.

लग्न सराईचे दिवस नसतानाही सोन्याच्या दारात तेजी आहे. तेजी असल्याने सोन्याची विक्रीत वाढ झाली आहे. खरेदी मात्र मंदावली आहे. जागतिक आणि देशांतर्गत मंदीच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणूक गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटत असल्याचे चित्र आहे.