नवी दिल्ली : कोरोनामुळे आर्थिक संकट ओढवलेले असताना गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात बदल झाले. पारंपारिक गुंतवणुकीचा मार्ग म्हणून पुन्हा दागिन्यांकडे गुंतवणूकदार वळले, त्यामुळे सोने, चांदीच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र आता सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर ४ हजार रुपयांनी घसरून ५१, ७०० (प्रति तोळा )रुपयांवर आले आहेत, तर चांदीतही किलोमागे १२००० रुपयांची घसरण झाली आहे. कोरोनामुळे सोने, चांदीत गुंतवणूक वाढल्याने सोने, चांदीच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठले होते. मात्र आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
रशियाने कोरोना लशीची घोषणा करताच खरेदीत मंदी येऊन विक्रीत तेजी आली. त्यामुळे मंगळवारी ७५,५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १२ हजार रुपयांनी घसरण होऊन ती बुधवारी ६३, ५०० रुपये प्रतिकिलोवर आली. अशाच प्रकारे मंगळवारी ५५,७०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात चार हजार रुपयांनी घसरण होऊन ते ५१,७०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.