नवी दिल्लीः जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूमुळे जगातल्या आर्थिक बाजाराला मोठा फटका बसला आहे. गेल्याकाही दिवसापासून मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. यामुळे मंदीच्या प्रभावाने आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात सोने, चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजार उघडताच आज सोन्याच्या दरात २६०० रुपयंची घसरण पाहायला मिळाली, तर चांदीचे दरात घसरण झाली आहे. सोन्याचे भाव ४१ हजार ५५६ रुपयांवर आला आहे.
कोरोनाचा प्रभाव सोन्याच्या भावावर सर्वाधिक पडला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे सोने अन् चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. गुरुवारी सोने १२८रुपयांनी स्वस्त होऊन त्याचा भाव ४४ हजार ४९० रुपयांवर आला होता. तसेच चांदी ३०२ रुपयांनी स्वस्त होऊन भाव किलोला ४६ हजार ८६८ रुपये झाला होता.
कमॉडिटी बाजारात सोन्याच्या दरात रुपयांची घट झाली होती. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ४३ हजार २९७ रुपयांपर्यंत खाली आला होता. चांदीच्या किमतीत मात्र वाढ झाली. चांदीचा भाव ६१३ रुपयांनी वधारला आणि ४५ हजार ३१२ रुपयांवर आला होता. काल मुंबईत सराफा पेढींवरही सोन्याचा दर दहा ग्रॅमला ४३ हजार २०० रुपये झाला होता. तर त्यामध्ये ७७ रुपयांची वाढ झाली होती. बुधवारी सोने ५१६ रुपयांनी स्वस्त झाले होते. दिल्लीत सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ४४ हजार ४९० रुपये झाला होता.