उद्यापासून जिल्ह्यातील सेवांना आता दुपारी ४ वाजेपर्यंतच परवानगी

डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे नव्याने आदेश

जळगाव – जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूचे रूग्ण आढळुन आले असुन त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे उद्या 27 पासून  निर्बंधाचे नव्याने आदेश जारी केले आहे. यात जिल्ह्यातील अत्यावश्यक व इतर सर्व सेवांसाठी दुपारी ४ वाजेपर्यंतच परवानगी राहणार आहे. तसेच शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.