सोमवारपासून श्री आशापुरी मातेच्या यात्रोत्सवास सुरूवात

0

शिंदखेडा । खान्देशातील शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री आशापुरी मातेचा यात्रोत्सव 10 एप्रिलपासून सुरु झाला आहे. यानिमित्त भक्तांची मोठी गर्दी होत असून ट्रस्टतर्फे भक्तांना सर्व सोयी पुरविल्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शिंदखेडा शहरापासून तीन कि.मी. अंतरावर पाटण गावाजवळ बुराई नदीच्या काळावर श्री आशापूरी मातेचे मंदिर आहे. यात्रा चैत्रशुद्ध 14 (चर्तुदशी) या दिवशी देवीच्या मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते पूर्वी ही यात्रा महिनाभर भरत असे मात्र सध्या दहा दिवस यात्रोत्सव असतो. यावेळी नवस फेडण्यासाठी भक्तांची खूप गर्दी असते. देवीला पूरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रथ देवीभोवती प्रदशिक्षणा घालण्यात आली.

संसारोपयोगी वस्तूंची दुकाने
यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात संसारोपयोगी व खेळणांच्या वस्तुंचे दूकाने थाटण्यात येतात. लांबून व्यापारी या यात्रोत्सवासाठी येतात. दरम्यान, चैत्र शुद्ध चावदस म्हणजे यात्रोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी हनुमान जयंतीनिमित्ताने कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येते या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील मल्ल भाग घेतात. विजयी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येते. या स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा 11 एप्रिल रोजी कुस्ती स्पर्धा होणार आहे.श्री आशापूरी मातेचे रूप सर्वच भक्तांसाठी शक्तीपीठ आहे. मातेची पाषाणमूर्ती पूर्वाभिमुख असून तीन फूट उंचीची मूर्तीसमोर थोडीसी उत्तरेकडे झुकलेली आहे. भक्तांची प्रार्थना ऐकण्यासाठी देवीची मान झुकलेली आहे.

असे आहे मातेचे मंदिर
पाटण गावालगत महामार्गाच्या वळणावर एक किल्लेवजा कोट आहे. त्यात देवीचे अतिप्राचिन हेमाडपंथी पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिराच्या आतील बाजुला मोठा घुमट असून त्यातील छोट्या नक्षीकाम केलेल्या मंदिरात देवीची मूर्ती स्थापित आहे. मंदिराचा दरवाजा पूर्ण दगडात नक्षीकाम करून समोर चिरेबंदे दगडाचे खांब असलेले सभामंडप आहे. सभामंडपात उजव्या हाताला श्री गणेशाची प्राचीन मूर्ती तर डाव्या हाताला भगवान विष्णूचे वराह अवतारातील मूर्ती आणि शंकर पार्वतीची मूर्ती आहे.