जळगाव। शहरात काल सोमवारी रात्री अकरा वाजता वादळी वार्यासह पावसाच्या सरी कोसळल्यात. या वादळामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. पहिल्याच वादळी वार्यांनी महावीतरणच्या मान्सूनपूर्व नियोजनाचा फज्जा उडविला. अनेक भागात दोन तास तर खंडेराव नगराजवळील आर. एम. एस. कॉलनीत 19 तासानतंर वीजपुरवठा सुरळीत करण्यात पथकास यश आले. शहरात विविध भागात सुमारे 6 वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्यात. सोमवारी रात्री पावणे अकरा वाजेपासून वादळी वार्यांसह वीजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. वीस मिनिटे वादळी वार्यांसह जळगाव शहरात पावसाच्या सरी कोसळल्यात. वार्यांचा जोर जास्त असल्याने वीस मिनिटात पाऊस थांबला. शहरातील सागर पार्क येथे पेट्रोलपंपासमोरील 1, गणपती नगरातील सुमंगल कार्यालयासमोर 1, समर्थ कॉलनीत 1 तर उमाळा पपींग स्टेशनलला 2 वृक्ष कोसळलेत. तर आर.एम. एस कॉलीनीत झाडाची फांदी तुटून विदयुत तारा तुटल्याने ट्रान्सफार्मर जळाला. यासह शहरात अनेक भागात ब्रेक डाऊन झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता.
अनेक भागात वीज पुरवठा खंडीत
वादळी वारा व पावासामुळे रात्री 11 वाजता, खोटे नगर, जय हिंद कॉलनी, सुदत्त कॉलनी, हरिविठ्ठल नगर, शिव कॉलनी, खंडेराव नगर, कांचन नगरसह अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. अर्ध्यांतासात अनेक भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.तर शहरातील शिव कॉलनीत देखिल रात्री उशीरापर्यंत वीजपुरवठा खंडीत होता. आशाबाबा नगर मागील शामराव नगर, आर.एम.एस कॉलनी परिसरात वीजेच्या तारावर झाडाची फांदी पडल्याने ते तुटले. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा बंद होता. तक्रार केल्यानतंरही दुपारी 3 वाजेपर्यंत या भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.