जळगाव । मान्सून कालावधीपूर्वी व मान्सुन कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आपसात समन्वय साधणेसाठी व पुर्वनियोजन करणेकामी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 22 रोजी नियोजन भवनात मान्सुन पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विभाग निहाय 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करणे. विभाग निहाय मदत व बचाव पथकाची स्थापना व नोडल ऑफीसर यांची नियुक्ती करणे. शहरातील अतिक्रमीत भागातील अतिक्रमणे त्वरीत दुर करणे. अग्निशमन दल सुसज्ज व उदयावत ठेवणे, अग्निशमन कार्यासाठी आवश्यक वाहनांची देखभाल दुरुस्ती करणे. धरणाच्या विसर्गासबंधी माहिती वेळोवेळी या कार्यालयाच्या नियंत्रण कक्षात कळविणे व योग्य ती दखल आदी कामांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.