सोमवारी विशेष समित्यांच्या अध्यक्षांची निवड

0

विधि, शहरसुधारणा, महिला-बालकल्याण, क्रीडा समिती

पुणे : पुणे महापालिकेतील चार विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासाठी  सोमवारी निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी खास सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विधि, शहरसुधारणा, महिला-बालकल्याण आणि क्रीडा समिती या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अर्ज
सकाळी 11 वाजता विधि समितीची, 11.35 ला शहर सुधारणा समितीची, दुपारी 12.10 वाजता महिला-बालकल्याण आणि दुपारी 12.45 वाजता क्रीडा समितीची खास सभा होणार आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने उमेदवारी अर्ज भरले आहेत. शिवसेनेने मात्र एकाही पदासाठी अर्ज दाखल केला नाही.

सर्वाधिक सदस्य भाजपचे
महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने मागीलवर्षीप्रमाणे विशेष समित्यांमध्ये सर्वाधिक सदस्य भाजपचेच आहेत. पक्षीय बलाबलनुसार सदस्यांची नेमणूक याआधीच मुख्यसभेत करण्यात आली आहे. आता सोमवारी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषीविकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक सुशील खोडवेकर हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.