सोमाटणे फाटा पुलाजवळ अपघात; चार जण जखमी

0

महामार्गावरील सुरक्षा पट्टी मोटारीत घुसली

पिंपरी-चिंचवड : पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील पुलाजवळ मोटार अपघातात चौघेजण गंभीर जखमी झाले. महामार्गावर बाहेरून कोणतेही वाहन येवू नये, यासाठी दोन्ही बाजूने अ‍ॅल्युमिनियमची सुरक्षा पट्टी लावलेली आहे. भरधाव मोटार या पट्टीवर धडकल्यावर पट्टी मोटारीच्या आरपार घुसली. पुण्याहून मुंबईला मोटार जात होती.

सर्व जखमी मीरा भाईंदरचे
अमोल शिवाजी पाटील (वय 39), श्रीमंत कृष्णा भोंदे (वय 45), प्रकाश गोविंद वाईगडे (वय 45) व चालक सूर्याजी कृष्णा भोंदे (वय 39, सर्वजण रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर)जखमी झाले आहेत.