मुंबई : बॉलीवूडचा दबंग सलमान खानची पूर्व प्रेयसी अभिनेत्री सोमी अलीने आपल्या शोषणाची कहाणी सांगितली आहे. तिचा हा किस्सा तिच्या बालपणाचा आहे.
सोमी अलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिले आहे. तिने लिहिलंय, ”५ वर्षाची असताना माझे लैंगिक शोषण झाले होते आणि १४ वर्षाची असताना गैर कृत्य झाले होते. आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल ज्यांनी बोलले किंवा बोलण्याचा निर्णय घेतलाय त्या सर्वांना मला सलाम करायचा आहे. माझ्यासोबतही हे घडल्यामुळे असे करणे किती मुश्किल आहे, हे मी समजू शकते.”
सोमी म्हणाली,” हे आपले सत्य आहे आणि सत्य बोलायला घाबरायचे नाही. या संधीला वाया जाऊ देऊ नका. या संधीची खूप काळ वाट पाहावी लागली आहे.