सोमुर्डीचा पाझर तलाव 100 टक्के भरला

0

पुरंदर । दमदार पावसामुळे सोमुर्डी येथील पाझरतलाव यंदा 100 टक्के भरला आहे. या तलावातील पाण्याचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

सन 1972 च्या दुष्काळात या बंधार्‍याच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर 1986 साली माजी आमदार दादा जाधवराव यांच्या काळात याचे काम पूर्ण झाले. 1986 सालापासून हा पाझर तलाव आटलाच नव्हता. पण उन्हाळ्यात भरावचे व इतर काम पूर्ण करण्यासाठी यातील पाणी काढून पिकांसाठी वापरण्यात आले होते. त्यामुळे तलावाचे काम करणे शक्य झाले असल्याचे सरपंच सुनील पवार यांनी सांगितले. तलाव भरावाची दुरूस्ती, मजबुतीकरण तसेच पिचिंग काम यासाठी छोटे पाटबंधारे विभागाच्या वतीने 18.92 लाख रुपये खर्च करण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांनी यासाठी प्रयत्न केले. उपसरपंच सिंधुबाई भोराडे, शांताराम भोराडे, ज्ञानोबा शेंडकर, सुमन भांडवलकर आदींसह ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.