पशुवैद्यकीय अधिकार्यांसह, कर्मचारी गैरहजर; ग्रामस्थांचा झाला संताप
सोयगाव । सोयगाव शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात बुधवारी १३ सप्टेंबर रोजी पशुवैद्यकीय अधिकार्यांसह, कर्मचारीही गैरहजर असल्याने संतप्त शेतकर्यांनीच कुलुपबंद अवस्थेत असलेल्या दवाखान्याचा पंचनामा करून, दुसरे कुलूप ठोकल्याची घटना सोयगावला घडली. यामध्ये जंगलातांडा ता.सोयगाव येथील महिला पशुपालकांनी पंचनामा केल्याचे विशेष आहे. शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या अनेकदिवसापासून पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. यापूर्वी संतप्त पशुपालक तहसील कार्यालयावर धडकून पंचनामे केले आहे.
निवेदनावर यांची स्वाक्षरी
बुधवारी १३ सप्टेंबर रोजी शहरातील पशुवैद्यकीय अधिकार्यासह कर्मचारीही गैरहजर आढळल्यानेे महिला पशुपालक बहुलीबाई किसान राठोड (रा.जंगलातांडा ता.सोयगाव) या संतप्त झाल्याने या महिलेने पुरुषांना बळ देवून पंचनामा केला व दवाखान्याला स्वतंत्र कुलूप ठोकले. यामुळे तहसील प्रशासनासह पशुवैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान पंचायत समिती कार्यालयाचे अधिकारीही पंचनाम्यासाठी येण्यास तयार झाले नसल्याने महिला शेतकर्यालाच कुलूप ठोकण्याचा निर्णय घ्यावा लागला. या प्रकारामुळे गैरहजर पशुवैद्यकीय अधिकार्याचा व कर्मचार्याचा पंचनामा करण्यासाठी पंचायत समिती विभागाचे अधिकारी का आले नाही असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. निवेदनावर ज्ञानेश्वर चौधरी, प्रकाश ढाकरे, सखुबाई इंगळे, रतिलाल इंगळे, संजय इंगळे आदींच्या स्वाक्षर्या आहे.