सोयगाव। शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी केवळ कागदोपत्री व फसवी असून शेतकर्यांची राज्य सरकारने चेष्टा केली आहे. या फसवा कर्जमाफीने शेतकरी आणखी संकटात सापडलेला असून यासाठी विधानसभेत एकजुटीने आवाज उठविण्यात येईल असे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. सोयगाव तालुका कॉग्रेसतर्फे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सोयगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था येथे माझी कर्ज माफी झाली नाही या अभियानाअंतर्गत शेतकर्यांचे अर्ज भरण्यात आले.
शेतकरीबांधवांची उपस्थिती
कर्जमाफीची घोषणा करुन महिन्याभराचा कालावधी उलटला आहे मात्र अद्यापही एकही शेतकर्याला कर्जमाफी झाल्याचे लेखी मिळालेले नाही. त्यामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यावेळी पं.स.सभापती धरमसिंग चव्हाण, झेडपी सदस्य गोपीचंद जाधव, प्रभाकरराव काळे, दारासिंग चव्हाण, मदन राठोड, महेश चौधरी, महंम्मद पठाण, मोतीराम पंडित, बापू काळे, अक्षय काळे, लतीफ शहा, सुनील तिडके, शेख बबलू, बाबू चव्हाण, अमोल मापारी, विजय काळे, राजेद्र काळे, शांताराम चौधरी, पं.स.सदस्य उस्मान पठाण, जीवन पाटील, संजय आगे, आत्माराम गोतमारे, शेख अकिल आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते