सोयगावात सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयाची समितीकडून पाहणी

0

सोयगाव । स्वच्छ भारत अभियाअंतर्गत केंद्रीय समितीने सोयगाव शहराला भेट देऊन सार्वजनिक व वैयक्तिक शौचालायाची पाहणी केली होती. केंद्रित पथकाच्या अहवालवरून सोयगाव शहर हे दुर्गंधीमुक्त म्हणून शासनाने घोषित केले आहे. अशी माहिती नगरपंचायत मुख्याधिकारी सचिन तमाखडे यांनी दिली. जिल्ह्यात सोयगाव नगरपंचायत हि दुर्गंधीमुक्त ठरणारी पहिली नगरपंचायत आहे. स्वच्छ व सुंदर भारत अभियानाअंतर्गत सोयगाव शहर पांदणमुक्त व्हावे, यासाठी नगरध्यक्ष कैलास काळे उपाध्यक्ष योगेश पाटील, मुख्याधिकारी सचिन तमाखेडे यांनी वेळेवेळी बैठक घेऊन शहरात वैयक्तिक शौचालय बांधणार्‍या लाभार्थींना शासनाचे बारा हजार रुपये व चौदाव्या वित्त आयोगातून प्रोत्साहानपर तीन हजार रुपये असे एकूण 15 हजार रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

अहवालावरून केंद्रीय पथकाने केली पाहणी
या दोन्ही पथकांच्या अहवालावरून केंद्रीय पथकाने पथकप्रमुख नितीन धुमाळे यांच्या नेतृत्वाखाली शहराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान, केंद्र शासनाच्या पथकाने वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, शाळा, महाविद्यालय येथे भेटी दिल्या. तसेच नागरिकांशी संवाद साधला. 4 जुलै रोजी केंद्रीय पथकाने हि पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर केला होता. केंद्रीय पथकाच्या अहवालावरून सोयगाव शहर दुर्गंधीमुक्त झाल्याचे शासनाने घोषित केले. त्यासंबंधीचे पत्र नगरपंचायत प्राप्त झाले आहे. असे मुख्याधिकारी सचिन तामखडे यांनी सांगितले.दुर्गंधीमुक्त ठरणारी सोयगाव नगरपंचायत जिल्ह्यात सर्वप्रथम ठरली आहे. मुख्याधिकारी सचिन तामाखडे कर्मचारी व वृंद व सर्व नगरसेवक यांच्या अथक परिश्रमामुळे सोयगाव शहर दुर्गंधीमुक्त ठरले आहे. असे शिवसेनेचे उपनगराध्य्क्ष योगेश पाटील यांनी सांगितले.