सोयगाव औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत ध्वजारोहण नाहीच

0

सोयगाव। सोयगावच्या औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत स्वातंत्र दिनापूर्वीची ध्वजारोहनाची पूर्वतयारीच न झाल्याने, तंत्रशिक्षण विभागाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्यसह पाच कर्मचारी संस्थेत उपस्थित न राहिल्याने, संस्थेचे ध्वजारोहण झालेच नसल्याने बुधवारी 16 ऑगस्ट रोजी सोयगावला खळबळ उडाली आहे. सोयगावला भाड्याच्या इमारतीत औद्यागिक प्रशिक्षण संस्था गेल्या वीस वर्षापासून सुरु आहे. भाड्यापोटी जागेतील राष्ट्रध्वजाची जागा औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या ताब्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागाने प्रशिक्षण संस्थेला स्वतंत्रपणे ध्वज दिला असतांना, संबंधित संस्थेचे कर्मचारी प्रशिक्षण संस्थेच्या आवारात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते, त्यामुळे केवळ एक शिपाई कर्मचारी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला ऐनवेळी उपस्थित झाला. उर्वरित कर्मचार्‍यांनी मात्र औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या ध्वजारोहणाला पाठ फिरविल्याने संस्थेच्या स्वतंत्र ध्वजारोहणाचा फज्जा उडाला होता. दरम्यान दुसरीकडे प्रशिक्षण संस्थेच्या वतीने एकाच आवारात दोन ठिकाणी ध्वजारोहण करता येत नसल्याने, प्रशिक्षण संस्थेचे व संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे एकत्रित ध्वजारोहण करण्यात येत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

सूचना नसल्याचे उघड
संस्थेत विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या तंत्र शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना मात्र ध्वजारोहणापुर्वी स्वातंत्र दिनाच्या ध्वजारोहणाला उपस्थित राहण्याच्या सूचनाही संबंधित विभागाने दिलेल्या नसल्याचे बुधवारी 16 ऑगस्ट उघडकीस आले आहे.

तालुक्यातील ध्वजारोहणाच्या संदर्भात गुरुवारी दि.17 अहवाल घेण्यात येईल, सोयगावच्या प्रशिक्षण ध्वजारोहणाच्या प्रकरणी अद्याप काहीही माहित नाही गुरूवार 17 ऑगस्ट रोजी माहिती घेवून दोषी आढळलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल.
छाया पवार, तहसीलदार, सोयगाव