सोयगाव । सोायगाव शिवारात बिबट्याचा भरदिवसा तीन तास थरार चालल्याने रविवारी सोयगाव शेती शिवाराला दुपारनंतर शासकीय सुटीचे स्वरुप प्राप्त झाले होते. दरम्यान दुसर्या एका बिबट्याने बहुलखेड्यात म्हशीच्या पिलाला शेतातील वाड्यातून फरफटत ओढत आणून जोरदार हल्ला चढविल्याची घटना रविवारी 3 सायंकाळी उशिरा घडली. या प्रकारामुळे सोयगाव परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.
चाळीसगाव तालुक्यातही बिबट्याचा संचार
चाळीसगाव । तालुक्यातील वरखेडे शिवारापासून अवघ्या 4 किलोमिटर अंतरावर असलेल्या दरेगाव शिवारातील चंदरसिंग भिल्ल यांच्या आठ वर्षीय मुलगा आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात पत्नीसह कापूस वेचण्याचे काम करत असतांना बिबट्याने बालकावर हल्ला केला, मात्र प्रसंगावधान थोडक्यात बचावला असून निसटत्या हल्ल्यात मानेवर जखमा झाल्या आहे. याबाबत माहिती मिळताच वरखेडे येथे आगोदर पासून तैनात असलेला वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी झालेल्या बालकाला उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
बिबट्याच्या पिलांनी व मादीचे मुक्तसंचारमुळे दहशतीचे वातावरण
सोयगाव शेती शिवारातील रावेरी, वेताळवाडी आदि शिवारातही बिबट्याच्या पिलांनी व मादीने मुक्तसंचार केल्याने भरदिवसा बिबट्याने डोकेवर काढले होते. दरम्यान बहुलखेडा ता.सोयगाव शिवारात शेतकरी निमेश चौधरी यांच्या म्हशीच्या पिलाला फरफटत ओढत ठार केले. दुसरीकडे कापूस वेचणी करणार्या विष्णू चव्हाण या शेतकर्याला दहा फुट अंतरावरून बिबट्याचे दर्शन झाले. परंतु शेतकर्याच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले. दरम्यान बिबट्या डोळ्यासमोर दिसताच काहीकाळ शेतकरी विष्णू चव्हाण शेतातच बेशुद्ध अवस्थेत पडल्याची खळबळजनक घटना घडली होती. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उपचारासाठी पिंपळगाव(हरे)ता.पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे खासगी वैद्यकीय सूत्रांनी बोलतांना सांगितले. या बिबट्या वाघांच्या कळपांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य महमद शरीफ, राजमल पवार यांनी केली आहे. दरम्यान, बहुलखेडा शिवारात रविवारी रात्री आठ वाजेनंतर पुन्हा बिबट्यांच्या डरकाळ्याचा आवाज सुरु झाल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. त्यामुळे बहुलखेड्याच्या ग्रामस्थांनी रात्र जागून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
माहिती मिळताच गावकर्यांची धाव
सोयगाव शिवारासह कंकराळा, निंबायती, धिंगापूर आणि बहुलखेडा आदि भागात रविवारचा दिवस बिबट्यांचा उजाडला होता. दिवसभर या भागात बिबट्याच्या वाघाच्या चार बिबट्यांनी मुक्तसंचार करून धुमाकूळ घातला होता. तालुक्यातील बहुलखेडा शिवारात कापूस वेचणी करणार्या महिला मजुरांना बिबट्याच्या परिवाराने डरकाळ्या काढत हुसकावून लावले. दरम्यान बिबट्याच्या भीतीपोटी महिला मजुरांनी जीव हातात घेवून धास्तीने पळ काढला होता. महिला मजुरांनी गावात या प्रकारची माहिती देताच काही ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेवून बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. परंतु मानवी हस्तक्षेप दिसताच बिबट्याच्या परिवाराने घनदाट झाडीत पळ काढला.