सोयगाव । प्रहार अपंग क्रांती आदोलनतर्फे आमखेडा गावाच्या व तालुक्यातील अपंग बांधवांच्या विकासासाठी मागण्याचे निवेदन तहसीलदार शारदा पवार व गट विकास अधिकारी यांना प्रहार अपंग क्रांती आदोलनाचे तालुका कार्याध्यक्ष संदीप रामदास इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. आमखेडा गावासाठी आमखेडा ग्रामपंचातकडून आजपर्यंत अपंगांचा 3 टक्के निधी खर्च करण्यास टाळाटाळ करण्यात आली.
निवेदनावर यांच्या स्वाक्षर्या
या निवेदनावर आमखेडा तंटामुक्तीचे अध्यक्ष एकनाथ गोंड प्रहार क्रांती आदोलनाचे शहराध्यक्ष संजय बाबुराव मिसाळ, विनोद सिंधार्थ पगारे, अशोक फुसे, मंगलाबाई चौधरी, वंदनाबाई दामधर, सुरेश आगे, विठ्ठल नवगिरे, शे. गुलाब (मामू), सीताराम पंडित आदींच्या स्वाक्षर्या आहेत. जिल्हा परिषद गटात आमखेडा ग्रामपंचायत गट हा सर्वात मोठा गट आहे. व विधानसभा गटात पण आमखेडा हे गाव सोयगाव शहरा लगतच आहे. तरी पण ह्या गावात रस्थाच नाही त्यामुळे आमखेडा गावात स्वताचे घर असतांना देखील अपंग व्यक्तीला नामे संदीप रामदास इंगळे यांना रस्त्या अभावी रूम रामजीनगर येथे राहावे लागत आहे. लवकर रस्त्याची व्यवस्था झाली नाही तर उपोषणाचा इशारा दिला आहे.