सोयगाव । तालुक्यातील शेतीशिवारात रोहिया या हरणा सारख्या दिसणार्या हिंस्त्र प्राण्याकडून खरीप पिकाची नासधूस होत आहे. नुकतेच कापसाची लागवड करण्यात आली असून कापसाच्या कोवळ्या पिक रोहिचे कळप उध्वस्त करत आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाने त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे. सोयगाव शिवारात गलवाडा, वेताळवाडी, रावेरी हे गाव डोंगर पाठ्याशी वसले आहे.
अजिंठा डोंगर रांगातून येणारे रोहींचे कळप मका, ज्वारी, कपाशी मक्याचे पिक उध्वस्त करत आहे. वनविभागाने त्वरीत बंदोबस्त करावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषणास करण्यात येईल असा इशारा काही शेतकर्यांनी दिला आहे. दरम्यान आधीच सोयगाव शिवारात पावसाने दडी मारली असतांना शेतकरी पिकांच्या वाढीसाठी मोठा प्रयत्न करत आहे. पावसाअभावी पिकांची स्थिती चिंताजनक झालेली आहे. त्यातच रोहींचे कळपे पिकांचे मोठे नुकसान करत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.