सोयगाव। तालुक्यातील हनुमंतखेडा येथील अल्पवयीन बालिकेच्या हत्याकांडातील आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतरही बुधवारी 19 जुलै रोजी बालिकेच्या हत्याकांडाबाबतचा नागरिकांचा रोष तालुक्यात कायम असल्याने या प्रकरणाची धग अद्यापही कमी होण्यास तयार नसल्याने सोयगाव तालुक्यात विविध ठिकाणी या अल्पवयीन बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आले असून या घटनेचा निषेध करण्यासाठी महिलाही पुढे सरसावल्या आहे. सीमा राठोड हत्याकांडा प्रकरणी बुधवारी 19 जुलै रोजी सोयगावला शासकीय कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शहरातील शासकीय कार्यालयात अभिवादन
पंचायत समिती, तहसील कार्यालय, वनविभाग, सामाजिक वनीकरण, अजिंठा शिक्षण संस्थेचे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, न्याश्नाल मराठी हायस्कूल, सामाजिक वनीकरण, तालुका कृषी विभाग आदि ठिकाणी सोयगावात शासकीय कार्यालयांत सीमा राठोड या अल्पवयीन बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यामुळे या खून प्रकरणाची आरोपी पकडल्यानंतरही धग कायम दिसून आली. सभापती धरमसिंग चव्हाण, उपसभापती साहेबराव जंगलू, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे, पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, प्रतिभा जाधव, लताबाई राठोड, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, मंगेश सोहनी, गटविकास अधिकारी अंबादास गायके, तहसील कार्यालयात तहसीलदार छाया पवार, सामाजिक वनीकरण कार्यालयात वनीकरण अधिकारी प्रसाद गायकवाड, वैशाली फुले, कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी सुदाम घुले, रोहिणी वळवी, सपकाळे, आरती बाविस्कर आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.
विधानसभेत आवाज उठवू – आ.सत्तार
बालिकेचा खून करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्याच्या दुसर्याच दिवशी आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट देवून पिडीत कुटुंबियांचे सांत्वन केले. खूनप्रकरणी विधानसभेत आवाज उठवून मारेकर्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्याचे आश्वासन दिले