सोयगाव नगराध्यक्षपदासाठी सर्वपक्षियांची मोर्चेबांधणी

0

सोयगाव (शालिक देसाई)। शहरात नगरपंचायत होऊन दोन वर्षाचा कालावधी होत नाही त्यात सेना नगरसेवकांना फुटीचे ग्रहण लागेल असून सिल्लोड येथील सेनेचे नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सेनेचे नगरसेवक व कार्यकर्त्यांची बैठक शहरात नुकतीच पार पडली त्यात येथील सेनेचे 4 नगरसेवक भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरु आहे. या वृत्ताच सेनेच्या स्थानिक नेत्यांनी व भाजपाच्या नेत्यांनी दुजोरा दिला आहे. सध्या सदर नगर पंचायत भाजप सेनेच्या ताब्यात आहे. यात ऐनवेळी काँग्रेस पक्ष कोणती खेळी खेळणार हि येणारी वेळच सांगणार. सोयगाव येथे नगर पंचायत होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. सध्या नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे कैलास काळे व उपाध्यक्ष सेनेचे योगेश पाटील कामकाज बघित आहे. परंतु जिल्हा परिषद मध्ये झालेल्या काँग्रेस-सेना युतीचा अध्यक्ष उपाध्यक्ष झालेला आहे. तीच रननीती आमदार अब्दुल सत्तार व सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे येथे वापरली तर भाजप सेना युती संपुष्टात येऊ शकते त्या साठीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पूर्व श्रमाचे सिल्लोड येथील सेनेचे जेष्ठ नगरसेवक सुनील मिरकर यांना हाताशी धरून सोयगाव व सिल्लोड येथील नगरसेवक फोडून ते भाजपामध्ये आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे.

नगरसेवक सुनील मिरकर यांनी सोयगाव शहरात नुकतीच सेनेच्या कार्यकर्त्यांची व नगर सेवकांची बैठक घेतली त्या बैठकी मध्ये भाजपा प्रवेशाची चर्चा करण्यात आली. सद्या नगरपंचायतमध्ये भाजपाचे 8 सेना 6 काँग्रेस 3 असे एकूण 17 नगरसेवकांची संख्या बळ आहे. येऊ घातलेल्या नगराध्यक्षपद हे सर्व साधारण पुरुष निघाले असून या पदावर पुन्हा भाजपच्या वतीने जोरदार मोर्चे बांधणी सुरु झालेली आहे. 2 वर्षाच्या कार्यकाळात सेनेच्या नगरसेवकांची पंचायतमध्ये कामे होत नाही त्यांच्या वार्डाला निधी दिला जात नाही, कर्मचारी कामे ऐकत नाही, कामाच्या बाबतीत वार्डात भेदभाव करण्यात येतो, अशा परिस्थितीत सेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी घंटा गाडी चालवणार्‍या कर्मचार्‍याला जोरदार हाणामारी केली होती. या सर्व गोष्टीचा विचार करता सेनेच्या नगरसेवकांची कामे व तक्रारीची दखल औरंगाबाद येथील वरिष्ठ पदाधिकारी घेत नाही या कारणाने हि सदर नगरसेवक नाराज आहे. या सर्व पाश्‍वभूमीचा विचार करता सिल्लोड येथील नगरसेवक मिरकर यांच्याबरोबर सिल्लोड व सोयगाव येथील किती नगरसेवक व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील हे येणारा काळच ठरवील.