सोयगाव। सोयगाव पंचायत समितीच्या महिला सदस्यांचे पतीच अधिकारी व कर्मचार्यांना सूचना करत असल्याचे चित्र बुधवारी 19 जुलै झालेल्या बैठकीत दिसून आले. दरम्यान काँग्रेस आणि भाजपाच्या सदस्यांच्या पतिराजांची अधिकारी व कर्मचार्यांवर मजबुती निर्माण व्हावी, यासाठी सलग तिसर्या बैठकीपासून पतिराजांना या बैठकीत प्रवेश देवून सूचना मांडण्याचे अधिकार देण्यात येत असल्याने संबंधित गणाच्या विकासाला या केविलवाण्या प्रयत्नात खीळ बसली आहे. सोयगाव पंचायत समितीची मासिक बैठक सभापती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येते.
पतिराजांच्या उपस्थितीमुळे नागरीकांमध्ये नाराजी या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून काही महत्वपूर्ण ठराव घेतल्या जातात परंतु महत्वपूर्ण ठराव सुचविण्यासाठी महिला सदस्यांच्या पतिराजांच्या सूचनेप्रमाणे घेतल्या जातात, पतिराजांच्या मासिक बैठकीतील लुडबुडीमुळे ग्रामीण भागातील विकासाला खीळ बसल्याने नागरिकही कमालीचे वैतागले आहे. गटविकास अधिकारी या पतिराजांना प्रवेश देतात हा सोयगावात चर्चेचा विषय ठरला होता. काँग्रेस आणि भाजपाच्या महिला सदस्यांच्या पतिराजांची अधिकारी व कर्मचार्यावरील पकड मजबूत व्हावी असा प्रयत्न असल्याचे सलग तिसर्या मासिक बैठकीत दिसून आला आहे. सोयगाव पंचायत समितीत सहा सदस्य आहे. मासिक बैठकीत विविध विभागाच्या प्रमुखांकडून गावनिहाय आढावा घेतल्या जात असतो, परंतु पतिराज महाशय या आढाव्या तही डोकावून विभाग प्रमुखांना सूचना करत असतात. लोकशाहीच्या बळकटीकरासाठी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत. महिलांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे यासाठी प्रत्येक निवडणुकीत महिलांसाठी विशेष जागा आरक्षीत करण्यात आले आहे. पुरषी मानसिकतेमुळे महिलांना बोलण्याची संधी देण्यात येत नसते. काही ठिकाणी केवळ निवडणुकीसाठी महिलेचा वापर केला जातो. लोकशाहीच्या दृष्टीने असे कृत्य घातक असल्याचे सुर जनतेमधुन उमटत आहे.
पदाचा गैरवापर पत्नीकडे असलेल्या पदाचा गैरवापर करण्याचा प्रकार सोयगाव पंचायत समिती कार्यालयात सुरु आहे.यामध्ये भाजपा,काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एक व दोन अशी तीन सदस्य संख्या आहे.काँग्रेस पक्षाने सभापती पदासाठी शिवसेनेशी हातमिळवणी करून शिवसेनेला उपसभापतीपद देवून सभापती पद काँग्रेसकडे ठवले आहे.परंतु आगामी काळात काँग्रेसची शिवसेनेशी झालेली हातमिळवणी तुटली तर आगामी काळात भाजपाकव्हा सत्तेसाठी वापर करण्याचा उद्देश काँग्रेसचा दिसून येत असल्याने हा प्रकार सुरु असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
पंचायत समितीच्या मासिक बैठकीत अल्पवयीन बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम असल्याने त्यामुळे महिला सदस्यांचे पतीराज बैठकीला उपस्थित झाले असतील, परंतु त्यांची ही शेवटची बैठक असेल, यापुढे त्यांना बैठकीत प्रवेश नाकारण्यात येईल.
अंबादास गायके,
गटविकास अधिकारी, सोयगाव.