सोयगाव । सोयगाव पोलिसांच्या पथकाने विविध दोन ठिकाणी घातलेल्या छाप्यात अंदाजे 30 हजार रुपये किमतीची गावरान दारूची चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी गाळप करतांना चौघांना रंगेहात पकडून त्यांचेकडून 30 हजार 250 रुपयांची गावरान दारू हस्तगत करून दारू गाळपचे सह्त्य जप्त करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयगाव पोलिसांच्या अवैध धंद्यांच्या धाडसत्राच्या मोहिमेमुळे तालुक्यात अवैध दारू विक्रीसह इतर अवैध धंद्यांना मोठा चाप बसला आहे.
दस्तापूर व नांदगाव शिवारातील चौघांवर गुन्हा
दस्तापूर शिवारात कांतीलाल सोनवणे, योगेश वाघ आणि दुसर्या एका छाप्यात नांदगाव शिवारात शिवदास मोरे, संचलाल सोनवणे या दोघांना अटक करण्यात आली. चौघांवर गुन्ह्याची दाखल केला. पोलिसांनी सुमारे 600 लिटर गावठी दारु, दारु गाळप करण्याचे रसायन व साहित्य असा 30 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक डॉ.सुजित बडे, उपनिरीक्षक गणेश जागडे, सुभाष पवार, योगेश झाल्टे, प्रदीप पवार, सतीश पाटील, दीपक पाटील, दिलीप तडवी, संदीप चव्हाण, सागर गायकवाड, शिवदास गोपाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.