सोयगाव – उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील निमताणदार कर्मचाऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी अकरा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला चेतनलाल मोहनलाल रोतरे (वय-३९) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात ते निमताणदार या पदावर कार्यरत होते कार्यालयाच्या चाव्या त्यांच्याकडे असल्याने अद्यापही कर्मचारी कार्यालय उघडण्यास आला नसल्याचे पाहून कर्मचारी त्यांच्या घरी गेले असता खोलीत एकटा असलेल्या चेतनलाल मोहनलाल रोतरे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. पोलीस उपनिरीक्षक गणेश जागडे यांच्या सह पोलीस कर्मचारी पथकाने घटनेचा पंचनामा केला अद्याप आत्महत्येचे कारण समजले नाही .सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि शेख शकील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश जागडे, बीट जमादार संतोष पाईकराव, विकास लोखंडे, गोपाल शीवदास हे करीत आहे.