सोयगाव येथे पत्रकारास पोलिसांकडून मारहाण

0

सोयगाव। येथील गांजा तस्करी प्रकरणी पोलिसांच्या कारवाईचे वार्तासंकलनासाठी गेलेल्या वार्ताहरावर दंगा पथकाच्या पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेचा सोयगाव येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने 6 जुलै रोजी तीव्र निषेध नोंदविला व घटनेच्या निषेधाचे निवेदन तहसीलदार छाया पवार यांना देण्यात आले. मराठी पत्रकार संघटनेचे सोयगाव तालुकाध्यक्ष भरत पगारे यांच्या नेतृवात शहरातील शिवाजी चौकातून तालुका पत्रकार संघटनेच्या सदस्यांनी पायी रॅली काढून घटनेचा निषेध करत सोयगाव तहसील गाठले.

घटनेबाबत पोलिसांचा तीव्र निषेध
तहसीलदार छाया पवार यांना मागणीचे निवेदन देऊन पत्रकार प्रकाश पायगव्हान यांच्यावर बळ्।चा वापर करणार्‍या पोलिसांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच त्या पोलिसांवर त्वरित कार्यवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विवेकानंद बागुल, दिनेश चोपडे, विकास पाटील, शरद दामोदर, प्रशांत चौधरी, सुनील चव्हाण, नारायण चौधरी, सीताराम जाधव, गोकुलसिंग राजपूत, पूनम परदेशी, दिलीप देसाई, शंकर खराटे, शेख सुलेमान, गणेश खैरे, संजय शहापुरकर, विजय पगारे, गणेश देशमुख, सुनील गुजर, दिलीप शिंदे, सुनील काले, शिवाजी गुंजाळ, अनिल रावळकर, सुभाष राठोड, विनोद कोते, दिलीप देशमुख यांची उपास्थिती होती.