सोयगाव येथे शांतता कमेटीची बैठक

0

सोयगाव। गणेशोत्सव व बकरी ईद या दोन सणांच्या पार्शभूमीवर नागरिकांनी सज्ज राहावे,ही दोन्ही सार्वजनिक उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, त्याचप्रमाणे गणेशोत्सवात पत्ते खेळणार्‍यांची गय केली जाणार नसल्याच्या सूचना सहा.पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी गुरूवारी सोयगाव येथे शांतता कमेटीच्या बैठकीत दिल्या.अ‍ॅड. योगेश पाटील, विजय काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सहा.पोलिस निरिशक सुजित बडे बोलत होते. यावेळी गावातील अवैध दारू,किरकोळ वाद यावर चर्चा करण्यात आली.

बैठकीत यांची होती उपस्थिती
यावेळी अ‍ॅड. योगेश पाटील, विजय काळे, रविंद काटोले, भैय्या जुनघरे, पुनम परदेशी, पञकार राजेंद दुत्तोडे, शालिक आप्पा देसाई, योगेश बोखारे, दिलीप शिदे, दत्ताञय गाडेकर, महेश चौधरी, पसाद पठाडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जागडे, आदींसह गणेश मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते. आभार सोयगांव बीट जमादार त्रिलोकचंद पवार यांनी मानले.